Contaminated water supply has been taking place in Agarkar Mala area of ​​Ahmednagar for the last few days
Contaminated water supply has been taking place in Agarkar Mala area of ​​Ahmednagar for the last few days

आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठा

Published on

अहमदनगर : शहरातील आगरकर मळा परिसरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

संघाचे अध्यक्ष के.डी.खानदेशे, उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, सचिव शिवराज ससे, श्रीकृष्ण लांडगे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की आगरकर मळा परिसरातील टाकीच्या आतील बाजूस सेंटरिंगचे काम योग्य झाले नाही. टाकीत एक ते दोन फूट पाणी राहते. त्यामुळे तळात गाळ तसाच आहे. वसंत टेकडीपासून आगरकर मळ्यापर्यंत येणारी जलवाहिनी 50 वर्षांपूर्वींची आहे. ती सीना नदीतून टाकली असून, तिला गळती लागली आहे.

त्यामुळे पावसाळ्यात जलवाहिनीद्वारे दूषित पाणी येते. टाकी परिसर अस्वच्छ आहे. शुद्ध पाणी न मिळाल्यास व टाकीची स्वच्छता न केल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com