आजच घडले होते कोपर्डीचे क्रौर्य...चार वर्षांनंतर तेथे अशी आहे स्थिती

नीलेश दिवटे
सोमवार, 13 जुलै 2020

13 जुलै 2016 रोजी काळजाचा ठोका चुकेल असे क्रौर्य तालुक्यातील कोपर्डी येथे घडले. माणुसकीला लाजिरवाणी घटना त्यावेळी घडली.

कर्जत : कोपर्डी...हा शब्द उच्चारला तरी ते क्रौर्य लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं.त्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ती घटना आजच्याच दिवशी घडली होती. चार वर्षांनंतर तेथे ही स्थिती आहे.

आमचा दिवस उगवतो तिच्याच आठवणीने आणि मावळ तो ही तिच्याच विरहाने... चार वर्षे सरली मात्र माझ्या काळजाच्या तुकडयाला न्याय मिळाला नाही, तिचे मारेकरी फासावर लटकल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि असा गुन्हा करताना आरोपी शंभर वेळेस विचार करेल... असा आक्रोश होता कोपर्डी येथील निर्भयाच्या आई,वडील आणि लहान बहिणीचा.

13 जुलै 2016 रोजी काळजाचा ठोका चुकेल असे क्रौर्य तालुक्यातील कोपर्डी येथे घडले. माणुसकीला लाजिरवाणी घटना त्यावेळी घडली. निर्भयावर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्या घटनेला आज चार वर्षे उलटले. मात्र अजूनही तिचे आई आणि वडील शून्यात नजर रोखून तिच्या स्मृतीस्थळाजवळ तासनतास बसतात.

हेही वाचा - नगर महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

सकाळी-संध्याकाळी दोन्ही वेळेला तिची आठवण म्हणून नंदादीप लावण्यात येतो. तसेच दररोज केलेली भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवूनच त्यांच्या गळ्याखाली घास जातो .
आज चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोरोना असल्यामुळे कुठलेही श्रद्धांजली वा सार्वजनिक कार्यक्रम ठेवण्यात आले नाहीत.

अत्यंत साधेपणाने मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुष्प वाहण्यात आले, असे निर्भयाच्या वडिलांनी ई सकाळशी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Copardi case happened today