श्रीरामपूर तालुका वार्ता : अभियंत्यांना कोरोनायोद्धा पुरस्कार 

गौरव साळुंके
Saturday, 14 November 2020

जागतिक संविधान व संसदीय संघातर्फे येथील अभियंते चंद्रकांत परदेशी, डॉ. विजय साळवे, जितेंद्र पाटील, नगरसेवक प्रकाश ढोकणे यांना नुकतेच कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : जागतिक संविधान व संसदीय संघातर्फे येथील अभियंते चंद्रकांत परदेशी, डॉ. विजय साळवे, जितेंद्र पाटील, नगरसेवक प्रकाश ढोकणे यांना नुकतेच कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दत्ता विघावे यांच्या हस्ते कोरोनायोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

शहरात लॉकडाउन काळात मोलाचे कार्य केल्याबद्दल वरील मान्यवरांना कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब निघूट, नानासाहेब गांगड, ॲड. विनोद तोरणे, ॲड. प्रमोद सगळगिळे यांचे सहकार्य लाभले. राजेश कर्डक यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय साळवे यांनी आभार मानले. 

जाफर शाह यांची निवड  

श्रीरामपूर : येथील सामाजिक कार्यकर्ते जाफर शाह यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा समन्वयकपदी निवड झाली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. 

आमदार लहू कानडे, कॉंग्रेसचे महासचिव करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनिस शेख, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सुभाष तोरणे, बाबासाहेब कोळसे, इंद्रभान थोरात उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Award to Engineers in Shrirampur Taluka