esakal | कोरोनामुळे जावयांची धोंडे खाण्याची संधी हुकणार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona effect on more mass months this year

तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास म्हटले की, जावई मंडळींची चंगळ असते. जावयांना जेवणाच्या निमंत्रणांसह किंमती कपडे तसेच सासरे बुवांकडून मोठी किंमती भेट देण्याचा रिवाज आहे.

कोरोनामुळे जावयांची धोंडे खाण्याची संधी हुकणार

sakal_logo
By
मार्चंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास म्हटले की, जावई मंडळींची चंगळ असते. जावयांना जेवणाच्या निमंत्रणांसह किंमती कपडे तसेच सासरे बुवांकडून मोठी किंमती भेट देण्याचा रिवाज आहे. समजात गेली अनेक वर्षापासून रूढी परंपरेप्रमाणे ही पद्धती समाजात रूढ आहे. या मुळे जावयांना हा महिणा म्हणजे एक सुवर्ण संधीच असते. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे यावर नियंत्रण आले आहे त्यामुळे या वर्षी अनेक जावयांची ही संधी हुकणार असल्याने नवविवाहीत जावायांमध्ये नाराजी पसरली आहे.

कोरोना माहामारीमुळे गेली सहा महीने राज्यातील जनतेच्या चालीरीती वागणे, बोलणे, सण, उत्सव, लग्न समारंभ इतकेच काय अंत्यविधी आणि दशक्रीया विधी यांसह सर्वच सामाजिक असो की धार्मिक कार्यक्रम असो यामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. अता लोकांच्याही ते अंगवळणी पडले आहे. लोकांच्या वर्तनातही तसा बदल झाला आहे. 
त्याचाच परिणाम कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अधिक मासातही बदल दिसून येत आहे. दर तीन वर्षानंतर हा अधिक मास म्हणजेच पुरूषोत्तोम मास किंव त्यालाच धोंड्याचा महीनाही म्हणातात. चांद्र वर्षाचे दिवस व सौर वर्षाचे दिवस यांच्यातील फरक भरूण काढण्यासाठी दर तीन वर्षानंतर हा मास येत असतो. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांच्यात 11 दिवसांचा फरक आहे.

हा फरक भरूण काढण्यासाठी या महिण्याचे नियोजन केले जाते. याचा हेतू मराठी महिण्यातील सण व उत्सव हे त्या त्या महिण्यात यावेत असा आहे.
राज्यात गेली अनेक वर्षापासून नविन लग्न झालेल्या जावयांना आपल्या मुलीसह बोलावून त्यांना गोडधोड जेवनखान करूण नविन कपडे, तसेच किंमती वस्तू त्यात सोणे नाणे किंवा गाडी असे ऐपती प्रमाणे जावयास दान केले जाते. असे दान केल्याने पुण्याचा लाभ होतो अशी धारणा समाजात आहे. जावया बरोबरच आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही जेवणासाठी बोलावले जाते. अशी जुणी प्रथा समाजात रूढ आहे.

मात्र या वर्षी कोरोनामुळे जावयांना व पाहुण्यांना बोलावणेही धोक्याचे वाटत आहे. तसेच जावई व पाहुणे सुद्धा जेवणावळीस येण्याचे टाळत आहेत. त्यामुळे अधिका मासावरही कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या महिन्यात मंगलकार्य करू नये, अशी धराणा आहे. मात्र नैमित्तीक कामे व्रत वैकल्ये व दान धर्म कारावा अशी धारण समाजात आहे.या महिण्यात भगवान श्रीकृष्ण व विष्णूची पुजा करतात.

संपादन : अशोक मुरुमकर