
Ahmednagar Corona update | कोरोनाचे सहा हजार 777 आंतररुग्ण
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येमध्ये बुधवारी (ता. 19) मोठा उद्रेक झाला. दिवसभरात एक हजार 269 नवीन रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर शहरात सर्वाधिक 426 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (District Government Hospital) प्रयोगशाळेत 674, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 295 आणि अँटीजेन चाचणीत 290 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख 67 हजार 582 झाली आहे.(Ahmednagar Corona And Omicron Update Marathi News)
हेही वाचा: पाथर्डी तिहेरी हत्याकांड; शस्त्रासह झालेल्या युक्तीवादात काय काय घडलं?
सध्या सहा हजार 777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सात हजार 166 झाली आहे. राहाता तालुका रुग्ण संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 110 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुका रुग्ण संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आला असून 83 रुग्ण आढळून आले. श्रीगोंदे व पाथर्डी तालुका अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीगोंदे 76, पाथर्डी 73, पारनेर 63, नगर तालुका 63, शेवगाव 50, कोपरगाव 49, नेवासे 43, राहुरी 39, जामखेड, अकोले आणि लष्करी रुग्णालय प्रत्येकी 34, संगमनेर 17, कर्जत पाच, भिंगार छावणी परिषद नऊ, बाहेरील जिल्ह्यातील 56 तर परराज्यातील सहा रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या 406 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख 53 हजार 369 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.21 टक्के झाले आहे.
Web Title: Corona In Ahmednagar District Six Thousand Inpatient
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..