esakal | मंदिराच्या बंद दाराबाहेर भिंतीवर कोरोनमुक्तीचे पसायदान
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Pasaydan in Nevaset

जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माउलींनी नेवासेत ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्यानंतर 'पसायदान' ही विश्व प्रार्थना करून दान मागितलं. आशा विश्वात्मक नेवाशातूनच सध्या मंदिराच्या बंद दाराबाहेर, भिंतीवर कोरोनमुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.

मंदिराच्या बंद दाराबाहेर भिंतीवर कोरोनमुक्तीचे पसायदान

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माउलींनी नेवासेत ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्यानंतर 'पसायदान' ही विश्व प्रार्थना करून दान मागितलं. आशा विश्वात्मक नेवाशातूनच सध्या मंदिराच्या बंद दाराबाहेर, भिंतीवर कोरोनमुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.

नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे. सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील देवगडसह काही मंदिरांबाहेर भिंतीवर चिकटविलेले दिसून येत आहे.

यामधून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, घरातच निवांत बसून रहावे. एकमेकांशी हात न मिळवता दुरूनच नमस्कार करावा. सुरक्षित अंतर ठेवावे. थंड ऐवजी कोमट पाणी प्यावे. घरात बसून कंटाळा आला तर गृहिणीला मदत करावी, घराची, मनाची व तनाचीही साफसफाई करावी आदी उपदेश केला आहे.

पसायदानमधून शासन नियमांचे पालनाचे आवाहन : ससे महाराज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन विविध उपाययोजना करत समाजात जनजागृती करत असताना आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाचा संदर्भ घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन या पसायदानातून करण्यात आले आहे. असे कोरोना पसायदानचे लेखक नारायण महाराज ससे म्हणाले.

करोना पसायदानाचा सर्वांनी बोध घ्यावा : उद्धव महाराज
नारायण महाराजांनी मोठे प्रबोधन केले आहे 'करोनापसायदान 'नेवासा तालुक्यातच नव्हे तर परिसरातील वारकरी भाविकांना मुखोद्गत झाले आहे. या कोरोना पसायदाना सर्वांनी बोध घ्यावा, असे आवाहन संत नारायण गिरी प्रतिष्ठानचे प्रमुख हभप उद्धव महाराज नेवासकर यांनी केले.

कोरोना पसायदान
आता सर्वात्मके जीवे। विनाकारण न फिरावे।
घरीच बैसूनी रहावे। निवांतपणे॥
एकमेका कर न मिळवावे। दुरुनीच नमस्कारावे।
अंतर सुरक्षित राखावे। परस्परामाजी॥
सर्वसर्वदा हात धुवावे। रूमालविना न शिंकावे। कोमट जल प्राशावे। थंड वर्जावे सर्वथा ॥
घरी येता जरी कंटाळा। मदत करावी गृहिणीला।
पुण्य लगे जीवाला। पतीव्रतेचे॥
करा स्वच्छता सदनाची। त्याच बरोबर तनाची।
काढा जळमटे मानाची। शुचिर्भूत व्हावया॥
करा मनन आणि चिंतन। थोडा वेळ नामस्मरण।
चुकविता येईल मरण। स्वतःसहित इतरांचे॥
आज पावे तो खूप पळाला। आता विश्रांती शरीराला
सादर व्हावे समयाला। संत वचन हे असे॥
आहे विषाणूचे संकट। करा मनाला बळकट।
ध्यान योगाचा वज्रटत। उभारावा भोवताली॥
समय नव्हता म्हणोन। केले नसेल वाचन।
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन ।आतातरी वाचावा।। आयुष्याला पुरेल पुरोनिया उरेल।
ऐसे ग्रंथाची रेलचेल ।आहे संत कृपेने ।।
आहे विषाणूचे संकट ।करा म्हणाला बळकट। ध्यानयोगाचा वज्रतट। उभारावा भोवताली।।
शासन पोलीस डॉक्टर । आवाहन करती वारंवार। धोका वाढेल फार ।बेफिकीर राहता।।
हे हि जातील दुःखदिन ।।येतील सुखाचे क्षण।
तोवरी संयमाचे पालन। मनापासून करा रे।।
येथ म्हणेश्री निसर्ग राहो ।कोरोणा ना पसरावो
हेचि हेतू मनी ध्यावो।जनकल्याण हेतूने।।
।। सर्वे सुखिन: भवन्तु:।।

संपादन : अशोक मुरुमकर