esakal | सावधान... नगर शहरात पुन्हा घुसला कोरोना...सुभेदार गल्लीतील महिलेला लागण
sakal

बोलून बातमी शोधा

ONCE AGAIN CORONA PATIENT

या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

सावधान... नगर शहरात पुन्हा घुसला कोरोना...सुभेदार गल्लीतील महिलेला लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर - नगर शहर कोरोनामुक्त झालेले असताना पुन्हा त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे नगरकरांची काळजी वाढली आहे. नगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे.  जिल्ह्यात आता संगमनेर तालुक्याती धांदरफळ येथे कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत.

या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

नगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरातील सुभेदार गल्ली भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे. यापूर्वी नगरमध्ये मुकुंदनगर भागात कोरोनाचे रूग्ण आढळले होते.
 

loading image
go to top