सिद्धटेकमध्येही आढळला कोरोना रूग्ण, मुंबई कनेक्शन कायम

Corona patient also found in Siddhatech, Mumbai connection maintained
Corona patient also found in Siddhatech, Mumbai connection maintained

कर्जत: तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. परंतु बाहेरगावच्या लोकांमुळे प्रादूर्भाव झाला आहे. विशेषतः पुणे, आणि मुंबई येथील लोकांकडून ही लागण होते आहे. अगोदर राशीन आणि आता सिद्धटेकमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

तालुक्यातील सिद्धटेक येथील महिलेचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या मुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. पैकी तिघापैकी एक वृद्ध महिलेचे निधन झाले आहे.

तालुक्यातील सिद्धटेक येथे २२तारखेला तुर्भे, मुंबई येथून एक महिला आली होती. तिला तत्काळ तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले. तिचा स्राव तपासणीसाठी घेतला होता, तो रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या मुळे राशीनसह सिद्धटेक मार्गे कर्जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. या रिपोर्टची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून घबराट पसरली आहे.

प्रशासकीय यंत्रणेला हे रोखण्याचे आव्हान असून बोटचेपे धोरण सोडून दिखाऊपणा न करता प्रामाणिकपणे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात याव्यात, तालुक्याला पूर्णपणे घेरल्यावर यंत्रणा जागी होईल का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे


सिद्धटेक येथील महिलेचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून राशीन येथील रक रिपोर्ट प्रलंबित आहे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करावे.

-डॉ संदीप पुंड,तालुका आरोग्य अधिकारी,कर्जत

राशीन, सिद्धटेकसह तालुक्यातील प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावात कुणी नवखा अथवा बाहेरून माणूस आल्यास तत्काळ ग्राम समिती अथवा पोलिसांना कळवा , अफवांवर विश्वास ठेऊ नका. तो गुन्हा आहे. आरोग्य विभागाकडून खरी माहिती मिळेल.

-संजय सातव,पोलीस उपअधीक्षक, कर्जत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com