‘या’ नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव; पाच दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता कार्यालय राहणार बंद

गौरव साळुंके
Wednesday, 12 August 2020

नगरपालिका कार्यालयातील पाणी पुरवठा विभागातील एक अधिकारी आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नगरपालिका कार्यालयातील पाणी पुरवठा विभागातील एक अधिकारी आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणुन आजपासुन पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता नगपालिका कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. 

अत्यावश्यक सेवा विभाग वगळुन इतर सर्व विभाग बंद करण्यात आले आहेत. नागरीकांना विनाकारण नगरपालिकेत प्रवेश देण्यास मानाई करण्यात आली आहे. सदर सुचनेची सर्व नागरीकांनी नोंद घेवुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने आज केलेल्या रॅपीड तपासणीत १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रमीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४५३ वर पोहचली आहे. आज ४४ संशयीतांची रॅपीड तपासणी करण्यात आली.

प्रभाग एक, प्रभाग दोन, प्रभाग तीन, प्रभाग सात, राहुरी, गजानन वसाहत, म्हाडा परिसरासह सुतगिरणी परिसरातील रुग्णांचा त्यात समावेश आहे. तसेच आज ३७ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होवुन घरी परतले. तर येथील संतलुक रुग्णालयात अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. येत्या काळात नगरपालिका कार्यालयासह शहरातील विविध कार्यालयात रॅपीड तपासणी करण्याची मागणी शहरातुन होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found in Shrirampur municipality closed for five days