श्रीरामपूर तालुक्यात कैद्यांसह पोलिस कोरोनाच्या विळख्यात

गौरव साळुंके
Thursday, 30 July 2020

१५ कैद्यांसह चार पोलिस कर्मचारी आणि शहरासह तालुक्यातील १९ नागरीकांना कोरोनाचा संर्सग झाला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील १५ कैद्यांसह चार पोलिस कर्मचारी आणि शहरासह तालुक्यातील १९ नागरीकांना कोरोनाचा संर्सग झाला आहे. खासगी प्रयोग शाळेतुन प्राप्त झालेल्या अहवालातील नऊ तसेच रॅपीड तपासणी मधील दिवसभरातील दहा जणांसह रात्री उशिरा आढळलेल्या न्यायालयीन कोठडीतील १५ कैदी व शहर पोलिस ठाण्यातील चार पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

येथील मोरगेवस्ती परिसरातील ४९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान आज मृत्यु झाला. सदर महिला लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत होती. त्यांना कोरोनासह इतर आजार होता. उपचार सुरु असताना प्रतिसाद न मिळाल्याने आज अचानक प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. कोरोना नियमावलीनुसार पालिका प्रशासनाने आज दुपारी सदर महिलेवर अंत्यसंस्कार केले. शहरासह ग्रामीण भागातील २४५ नागरीकांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली असुन १३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुळे सात रुग्णांसह दोन संशयीतांचा मृत्यु झाला.

येथील संतलुक रुग्णालयात अॅक्टीव कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. केद्रीय आरोग्य विभागाने तापसणी संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाची आज कोरोनाबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन आज सकाळी ग्रामीण रुग्णालय विभागाला १०० रॅपीड तपासणी किट मिळाल्या आहे. सदर किट सकाळी ग्रामीण रुग्णालयाकडे मिळाल्या, परंतू तपासणी व्यवस्था तालुका आरोग्य विभागकडे असल्याने किट हस्तांतर प्रक्रिया दुपारपर्यंत सुरु होती. सकाळी मिळालेल्या तपासणी किट दुपारपर्यंत पडुन असल्याने तपासणी प्रक्रियेला विलंब झाला. अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मध्यस्तीने सदर किट तालुका आरोग्य यंत्रनेकडे सोपविल्यानंतर तपासणी प्रक्रीया सुरु झाली. 

तसेच कोरोनामुळे आज मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे सुरक्षा किट उपल्बध नसल्याने धावपळ उडाली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय विभागाला दिलेल्या सुचनेनुसार पालिका यंत्रनेला सुरक्षा किट मिळाल्यानंतर सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात रॅपीड तपासणी सुरु झाल्यापासुन कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात नागरीकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of four policemen in Shrirampur taluka is positive