माहिजळगाव व पाटेगावमधील नागरिकांना दिलासा; ‘ते’ रिपोर्ट निगेटिव्ह, सहा अहवालाची प्रतिक्षा

नीलेश दिवटे
Thursday, 9 July 2020

तालुक्यातील माहिजळगाव येथे व पाटेगाव एक एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या 42 व्यक्तींचे स्वॉब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ते अहवाल प्राप्त झाला असून त्यात माहिजळगाव येथील १६ पैकी १३ आणि पाटेगाव येथील २६ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. यामुळे काळजीत असलेली ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला असून अजून सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून धाकधूक वाढली आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील माहिजळगाव येथे व पाटेगाव एक एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या 42 व्यक्तींचे स्वॉब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ते अहवाल प्राप्त झाला असून त्यात माहिजळगाव येथील १६ पैकी १३ आणि पाटेगाव येथील २६ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. यामुळे काळजीत असलेली ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला असून अजून सहा जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून धाकधूक वाढली आहे.
राशीन, सिद्धटेक येथे रुग्ण बाहेरून आल्याची हिस्ट्री होती. मात्र माहिजळगाव व पाटेगावातील कोरोनाबाधित रुग्णांनी आम्ही बाहेर गेलोच नाहीत, असे सांगित आहेत. त्यामुळे प्रशासन व ग्राम समिती चक्रावून जात सतर्क झाली होती.  हे दोन्ही रुग्ण गावातील काही डॉक्टरांच्या व पॅथॉलॉजीकल लॅबच्या संपर्कात आल्याने त्यात अजून भर पडली होती. यामुळे दोन्ही गावातील जनजीवन विस्कळीत होत कोरोना ग्राम समितीच्या वतीने तीन दिवस कडकडीत बंद ठेवत जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता. संबंधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला होता. मात्र हे अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दोन दिवसांपासून माहिजळगाव, पाटेगावसह परिसरात अफवांचे पेव फुटले असून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क, आडाखे आणि खोट्या रिपोर्ट सांगितले जात होते. मात्र हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून अफवा पसरविणारा विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिला आहे.
सरपंच भैरवनाथ शेटे महणाले, तेरा अहवाल निगेटिव्ह आले असले तरी अजून तीन बाकी आहेत. ग्रामस्थांनी आज पर्यंत सहकार्य केले आहे ते इथून पुढे असेच ठेवावे.मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करा.तसेच आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे.लॉकडाऊन कालावधीत आठवडे बाजार बंदच राहील.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report in Pategaon and Mahijalgaon is negative