हिंडफिरे घाबरले! चला पळा रे माघारी, तिकडं कोरोना चाचणी करतेत

सोनईत प्रशासनाचा निर्णय
हिंडफिरे घाबरले! चला पळा रे माघारी, तिकडं कोरोना चाचणी करतेत
Updated on

सोनई (अहमदनगर) : सोनई बसस्थानक परिसरात कारण नसताना फिरणा-या ५६ व्यक्तींना ताब्यात घेवून सर्वांची अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये सापडलेल्या पाच पाॅझिटिव्ह व्यक्तींना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईने सर्वच रस्त्यावर एकच धावपळ उडाली. (Corona test of citizens walking on the road at Sonai)

सोनईतील बसस्थानक, डाॅ. आंबेडकर चौक भागात मोठ्या प्रमाणात शासन नियमाचे उल्लंघन होत असल्याने सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पोलिस पथकाने कोरोना नियंत्रण समितीसह रस्त्यावर उगाच फिरणा-या ५६ जणांना ताब्यात घेवून सर्वांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी केली. या तपासणीत पाच व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह सापडले. या सर्वांना शनैश्वर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

हिंडफिरे घाबरले! चला पळा रे माघारी, तिकडं कोरोना चाचणी करतेत
गडकरीजींनी सांगूनही भाजपनेत्यांची "राजकारणा"ची हौस फिटत नाही

आज सकाळी सोनईचे सरपंच धनंजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे व पोलिसांनी मुख्य रस्त्यावर तळ ठोकून दुचाकीवर कारण नसताना फिरत असलेल्या व्यक्तींची अॅन्टीजेन तपासणी केली. ही मोहीम सुरू होताच अन्य रस्त्यावरील गर्दी काही क्षणात गायब झाली. पोलिसांनी विचारणा केल्यावर अनेकांनी खुप महत्वाच्या कामासाठी चाललो, औषधे आणायला चाललो, रुग्णाकडे चाललो असे कारण सांगत सुटण्याचा प्रयत्न केला.

रूग्णसंख्या वाढल्यानेच

गेल्या चार,पाच दिवसांपासून सोनईतील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.पाॅझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरत असल्याने गंभीर स्थिती होवू शकते.यापुढे तपासणीचा वेग वाढवून काळजी घेतली जाणार आहे. ही मोहिम यापुढेही सुरू ठेवण्यात येईल.

- धनंजय वाघ, अध्यक्ष कोरोना नियंत्रण समिती

(Corona test of citizens walking on the road at Sonai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com