esakal | अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या १६ रुग्णांचा मृत्यृ
sakal

बोलून बातमी शोधा

corona news

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या १६ रुग्णांचा मृत्यृ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सहा हजार ६०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांची संख्या तीन लाख २९ हजार ११ झाली आहे.


जिल्ह्यातील बाधितांमध्ये संगमनेर तालुका आघाडीवर आहे. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक १३२ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर ८९ रुग्ण असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकोले तालक्‍यात ८४ रुग्ण असून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात १४४, खासगी रुग्णालय २७७, रॅपिड अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ८४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत तीन लाख १६ हजार ८९१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के झाले आहे.

हेही वाचा: नेवाशात प्रकरणे मंजुरीसाठी पैशांची मागणी; झेडपी सदस्याकडून भांडाफोड

loading image
go to top