
उपकेंद्र स्तरावर आयोजित केला गेलेला हे जिल्ह्यातील पहिलेच शिबिर ठरले. सरकारने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे.
नगर तालुका (अहमदनगर) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 45 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे, यासाठी नगर तालुक्यातील चास प्राथमिक आरोग्य केंद्र व सारोळा कासार येथील आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे सारोळा कासार येथे विशेष लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी 118 जणांना लस देण्यात आली.
उपकेंद्र स्तरावर आयोजित केला गेलेला हे जिल्ह्यातील पहिलेच शिबिर ठरले. सरकारने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी गावातच उपकेंद्र स्तरावर शिबिराचे आयोजन करण्याची मागणी उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पवार यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हे शिबिर घेण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुविधा धामणे, आरोग्यसेविका इंदुमती गोडसे, डॉ. राहुल धामणे, वर्षा धामणे यांच्यासह आशा सेविकांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.