कोरोनाचा शिक्षकांच्या वैद्यकीय प्रस्तावांच्या यादीत समावेश होणार

सनी सोनावळे
Tuesday, 27 October 2020

कोविड १९ आजाराचा प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रस्तावांच्या यादीत लवकरच समावेश होणार असल्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिले; अशी माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोविड १९ आजाराचा प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रस्तावांच्या यादीत लवकरच समावेश होणार असल्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिले; अशी माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.

ठुबे म्हणाले, राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी आरोग्य संचलनालय पुणे येथे राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांची भेट घेऊन राज्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना कोरोना आजाराची बाधा झाली आहे. उपचाराकरिता लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र या आजाराचा वैद्यकीय प्रस्तावांच्या यादीत समावेश नसल्यामुळे वैद्यकिय प्रतिपूर्ती देयकांपासून कर्मचारी वंचित आहेत. 

या आजाराचा समावेश तातडीने सदर यादीत करावा, अशी आग्रही मागणी केली. याबाबत तातडीने  आरोग्य संचालनालयाकडून कोरोना आजाराचा समावेश बाबतचा आदेश निर्गमित करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिले. आरोग्य संचालनालयास निवेदन देणे व चर्चा करण्यासाठी राज्याध्यक्ष राजेश सुर्व, राज्यसंपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, पुरुषोत्तम काळे, मधुकर उन्हाळे, रविकिरण पालवे, संजय शेळके उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona will be included in the list of teachers medical proposals