
शेवगाव : शहरातील आखेगाव रस्त्यावरील खासगी व्यापाऱ्याच्या कापसाच्या ढिगाऱ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास घडली. यामध्ये ४०० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तीन अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.