esakal | नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 45 हजार पार
sakal

बोलून बातमी शोधा

The Count of corona positive patient in Nagar district has 45000

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण 597 जण बाधित आढळून आले असून, आजअखेरपर्यंत जिल्ह्यात 45 हजार 25 रुग्ण आढळले. त्यांतील 40 हजार 317 जण बरे होऊन घरी परतले असून, 726 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत 3982 जणांवर उपचार सुरू आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 45 हजार पार

sakal_logo
By
आमित आवारी

नगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (शुक्रवारी) दिवसभरात एकूण 597 जण बाधित आढळून आले असून, आजअखेरपर्यंत जिल्ह्यात 45 हजार 25 रुग्ण आढळले. त्यांतील 40 हजार 317 जण बरे होऊन घरी परतले असून, 726 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत 3982 जणांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन आरोग्यदूतांकडून नागरिकांची तपासणी सुरू आहे. याचा सध्या चांगला फायदा दिसून येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात 755 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. आजअखेरपर्यंत 40 हजार 317 जण बरे झाले आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 73 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 20, अकोले पाच, जामखेड सहा, कर्जत एक, नगर ग्रामीण पाच, पारनेर दोन, राहुरी एक, शेवगाव एक, श्रीगोंदे 15, कॅंटोन्मेंट एक, मिलिटरी हॉस्पिटल 15 व अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 110 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 42, अकोले दोन, जामखेड सहा, कर्जत एक, कोपरगाव एक, नगर ग्रामीण 14, नेवासे पाच, पारनेर आठ, पाथर्डी सहा, राहाता पाच, राहुरी पाच, संगमनेर नऊ, शेवगाव दोन, श्रीगोंदे दोन, श्रीरामपूर एक, कॅंटोन्मेंटमध्ये एक रुग्ण आढळला आहे. 

अँटिजेन चाचणीत 414 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 31, अकोले 15, जामखेड 51, कर्जत 40, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 22, नेवासे 35, पारनेर 28, पाथर्डी 33, राहाता 14, राहुरी 19, संगमनेर 36, शेवगाव 33, श्रीगोंदे 16, श्रीरामपूरमध्ये 29 रुग्ण आढले आहेत. 

दरम्यान, आज 755 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 163, अकोले 45, जामखेड 35, कर्जत 49, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 38, नेवासे 27, पारनेर 29, पाथर्डी 61, राहाता 45, राहुरी 37, संगमनेर 81, शेवगाव 14, श्रीगोंदे 29, श्रीरामपूर 53, कॅंटोन्मेंट सात, तसेच मिलिटरी हॉस्पिटलमधील दहा जणांचा समावेश आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top