esakal | कोरोनात 'कावळ्यां'चाही लॉकडाऊन; सोनईतील दशक्रियाचा ओटा सुनसान
sakal

बोलून बातमी शोधा

The count of crows decreased in Sonai

सोनई येथील दशक्रियाविधी ओट्यावरचा मुक्काम कावळ्यांनी हलवला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसमोर पिंडाला कावळा शिवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनात 'कावळ्यां'चाही लॉकडाऊन; सोनईतील दशक्रियाचा ओटा सुनसान

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सोनई येथील दशक्रियाविधी ओट्यावरचा मुक्काम कावळ्यांनी हलवला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसमोर पिंडाला कावळा शिवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कावळ्यांच्या या लॉकडाऊनमुळे येथील विधी अन्यत्र होवू लागले आहेत.

अतिशय गजबजलेल्या ठिकाणी दशक्रियाविधी ओटा असतानाही येथे पुर्वी विधी सुरु असतानाच पिंडाला कावळा शिवत होता. यामुळे येथे गावातील व परिसरातील ग्रामस्थ विधी करत होते. येथे यशवंत प्रतिष्ठाण, ग्रामपंचायत व सोनई वाहन मेळाव्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व सुविधा करण्यात आलेल्या आहेत. येथील कावळ्यांनी आपला मुक्काम अन्यत्र हलविल्याने ग्रामस्थ आता प्रवरासंगम (टोका) येथे विधी करु लागले आहेत.

येथील ओट्यावर भाडोत्री वाहने लागतात. झाडावर बसलेले कावळे व इतर पक्षी वाहनावर घाण करत असल्याने चालक गलोलचा वापर करुन पक्षांना हाकलून लावतात. यामुळेच येथील कावळ्यांनी आपला मुक्काम हलविला असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. लॉकडाऊनच्या सात महिन्यात शंभरहून अधिक व्यक्तींचे निधन झाले. पैकी निम्म्याहून अधिक कुटुंबानी कावळा शिवत नसल्याने टोका येथे जावून विधी केला आहे.

बसस्थानक मागील आमरधाम येथे दशक्रिया विधीची सुविधा ग्रामपंचायतीने सुरु केल्यास ग्रामस्थांचा प्रश्न सुटेल. हा परीसर गावापासून बाहेर असल्याने अन्य अडचण येणार नाही, असे बापुसाहेब बारगळ यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top