esakal | आंबी खालसामध्ये मोरांची संख्या अचानक झाली कमी
sakal

बोलून बातमी शोधा

The count of peacocks in Ambi Khalsa suddenly decreased

चार पाच महिन्यात गावात दिसणारे मोर अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याने संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

आंबी खालसामध्ये मोरांची संख्या अचानक झाली कमी

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (अहमदनगर) : चार पाच महिन्यात गावात दिसणारे मोर अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याने संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील पाच वर्षात गावानजीक असलेल्या पानसवाडी व जोठेवाडी हा परिसर सतत मोरांच्या आवाजाने गुंजलेला असायचा. मात्र काही तरूण फेरफटका मारण्यासाठी गेले असता तेथे त्यांना मृत मोरांचे अवशेष सापडले. ही बातमी गावभर पसरली.

मोरांच्या हत्येमागे वन्यप्राणी किंवा अज्ञात समाजकंटकाची टोळी यापैकी नेमके कोणते कारण असावे. अशी चर्चा सुरू झाली. या दरम्यान गावातील काही जागृत तरूणांनी ही बाब वनविभागाच्या लक्षात आणली. तर वनविभागाच्या लगत असलेल्या शेतात मोरांच्या दर्शनाने आनंद व्हायचा. सध्याच्या मोरांच्या शिकारीबाबत शासन उदासीन असल्याचे दुः ख वाटते. अशा परिस्थितीत उर्वरीत मोरांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अशी खंत

बाळासाहेब ढोले, राजेंद्र गाडेकर, दत्तात्रय भुजबळ, अंकुश गाडेकर, पांडुरंग भुजबळ, बाळासाहेब गाडेकर, अर्जुन गाडेकर, साईनाथ भुजबळ यांनी व्यक्त केली. मोरांच्या शिकारप्रकरणी पानसवाडी व जोठेवाडी येथील परिसराची पाहणी सुरू केली असून या बाबतचा अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवला जाईल, अशी माहिती वनरक्षक श्रीमती पवार यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर