esakal | राहुरीत तब्बल पाचदिवसानंतर लसीकरणास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पहिला डोस 30 टक्के, दुसरा डोस 70 टक्के देण्याचा प्राधान्यक्रम ठरविला आहे.

राहुरीत तब्बल पाच दिवसानंतर लसीकरणास सुरुवात

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यात तब्बल पाच दिवसांपासून बंद पडलेले कोविड लसीकरण (Covid vaccination) आजपासून (ता. 6) सुरू झाले आहे. पहिला डोस 30 टक्के, दुसरा डोस 70 टक्के देण्याचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. पहिला डोस गावोगावी जाऊन, तर दुसरा डोस लसीकरण (vaccination) केंद्रात देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली. (Covid vaccination which has been closed for five days has been started in Rahuri taluka)

हेही वाचा: राहुरी कृषी विद्यापीठातील जैव तंत्रज्ञान प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर

"सकाळ'शी बोलताना तहसीलदार शेख म्हणाले, "तालुक्‍यातील तीन ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोविड लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रांसाठी प्रत्येकी 200 डोस उपलब्ध झाले आहेत. राहुरी शहरात सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयात लसीकरण केंद्र आहे. तेथे लसीकरणासाठी गर्दी होऊ नये, यासाठी टोकन नंबरनुसार लसीकरण केले जाईल. वांबोरी व ताहाराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची गर्दी टाळण्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल.'

आजअखेर झालेले लसीकरण

लसीकरण केंद्र, पहिल्या व दुसऱ्या डोसची संख्या कंसात : बारागाव नांदूर (1118, 340), देवळाली प्रवरा (3686, 440), गुहा (2321, 122), टाकळीमिया (2277, 453), मांजरी (2018, 163), उंबरे (2949, 827), राहुरी (5356, 2674), वांबोरी (1792, 523), ताहाराबाद (1359, 153).

(Covid vaccination which has been closed for five days has been started in Rahuri taluka)