अहमदनगर : क्रिकेटवर सट्टा चालविणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricket betting

अहमदनगर : क्रिकेटवर सट्टा चालविणाऱ्यास अटक

अहमदनगर - आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. चास (ता. नगर) शिवारात ही कारवाई करण्यात आली. नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की अहमदनगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात फलके फार्मच्या शेजारी आरोपी सागर कैलास सपकाळ (रा. आगरकर मळा, अहमदनगर) हा आयपीएल क्रिकेट सामन्यावर आरोपी साजिद पठाण (रा. घोडेगाव, ता. नेवासे) याच्या सांगण्यावरून सट्टा चालवीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोपान गोरे, पोलिस नाईक लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, संदीप पवार, सचिन आडबल यांच्या पथकाने चास शिवारात छापा टाकून सागर याला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल, आकडेमोड केलेली वही, असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस नाईक लक्ष्मण खोकले यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cricket Betting Man Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top