esakal | षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट, क्रिकेट वर्तुळात शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer Rohit Shinde dies in accident

मैदानावर आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवणारा फलंदाज आज काळाने नेला.

षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट, क्रिकेट वर्तुळात शोककळा

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : क्रिकेटच्या मैदानावर तो उतरला की षटकार, चौकारांची बरसात असायची. गोलंदाजांना तो मैदानाबाहेर टोलवायचा. त्याची विकेट घेण्यासाठी भलेभले जीवाचं रान करायचे. पण त्या उदयोन्मुख क्रिकेटपटूची खड्ड्यांनी विकेट काढली. 

तालुक्यातील चापडगावच्या विद्यानगर स्पोर्टस क्लबचा हा खेळाडू आता मैदानात कधीच दिसणार नाही.

माही जळगाव येथे नगर सोलापूर मार्गावर काळाने हा डाव साधला. या अपघातात उदयोन्मुख  क्रिकेटपटू रोहित मधुकर शिंदे (वय 28 रा चापडगाव ता कर्जत जि नगर) याचा दुर्दैवी अंत झाला. रोहित परदेशी  22 आणि सूरज गुप्ता (30 दोघे करमाळा जि सोलापूर) हे जखमी झाले आहेत. तिसऱ्या जखमींचे नाव समजू शकले नाही. (त्यास अपघात घडल्या नंतर नगर येथे हलविण्यात आले)
या बाबत सविस्तर वृत्त असे की रोहित शिंदे हा मोटारसायकलवरून करमाळ्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली.तीत रोहित शिंदे हा जागीच ठार झाला तर रोहित परदेशी व सुरज गुप्ता हे दोघे व एक जण असे तिघे  जखमी झाले आहेत.रोहित हा उदयोन्मुख युवा क्रिकेट पटू होता.तो कडा येथून सहकाऱ्यांसमवेत क्रिकेट मॅच खेळून गावाकडे चापडगाव येथे परतत होता. त्याने अनेक मॅचेस एकहाती जिंकल्या आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यांचा बळी
नगर सोलापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, रोहित शिंदे त्याचा बळी ठरला. तो घरातील कमावता होता. त्यावरच त्यांचे कुटुंब चालायचे. त्याला क्रिकेटचे वेड होते. तो मोलमजुरी करायचा. मात्र, क्रिकेट नियमित खेळायचा. एका स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या अकाली जाण्याने चापडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top