
पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
राहुरी (अहमदनगर) : चिंचविहिरे येथे बुधवारी (ता. 23) पहाटे सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित तरुणीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी काल (शुक्रवारी) पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
अश्विनी गौतम नरोडे (वय 20, रा. चिंचविहिरे) असे मृताचे नाव आहे. गौतम विजय नरोडे (पती), विजय शंकर नरोडे (सासरा), सोनाली विजय नरोडे (सासू), प्रतिभा विजय नरोडे (सावत्र सासू) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी पसार आहेत.
मृताचे चुलते माधव दादासाहेब मिजगुले (वय 45), रा. कोल्हार भगवती, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, पुतणी आश्विनीस आरोपींनी वेळोवेळी मानसिक, शारिरीक छळ करुन तिचा आपमान केला. तिच्याकडे नवीन शेत जमीन घेण्यासाठी पैशाची मागणी करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
संपादन : अशोक मुरुमकर