टेम्पोखाली चिरडून सासऱ्याकडून जावयाची हत्या, कर्जतमधील घटना

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कौडाणे येथे सासऱ्यानेच जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. सासऱ्याने जावयाला टेम्पो खाली चिरडले आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. यामध्ये दत्तात्रय जाणू मुळे यांचा मृत्यू झाला आहे. विनोद प्रशांत गोल्हार याने सुद्रीक कुटुंबियांच्या सांगण्यावरून हा टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप केला जात आहे.

Crime News
'मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द फिरवला म्हणणं योग्य नाही'

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, दत्तात्रय मुळे यांची कौडाणे येथे सासुरवाडी आहे. ते सासुरवाडीतून मुलाला घेऊन येण्यासाठी गेले होते. मात्र मुलाला सोबत पाठवण्यास सुद्रीक कुटुंबियांनी नकार दिला. तुम्ही मुलाला इतक्यात का घेऊन जात आहे असा सवाल त्यांनी केला.

यावेळी सासरा आणि जावयात शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, रवींद्र बाबासाहेब सुद्रीक यांच्या सह इतरांनी मुळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर टेम्पो घाल असं सांगण्यात आलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. टेम्पोची धडक लागून मुळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत असून हा कौटुंबिक वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Crime News
PHOTO : प्रार्थना बेहेरेचा पुन्हा साखरपुडा.. नेहा- यश अडकणार लग्नबंधनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com