Crime news : अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल ‘गँगवार’च्या दिशेने ; चार महिन्यांत १५ खून

दोन पेक्षा अधिक गुन्हे करणारे पाच हजार गुन्हेगार सक्रिय
ahmednagar crime murder
ahmednagar crime murder sakal

अहमदनगर : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तब्बल पंधरापेक्षा अधिक खून झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या ओंकार भागानगरे खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला. पोलिस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांचे हिस्ट्री शीट तयार केले. ‘टू प्लस’ मोहिम राबविली, तरी वाढत्या गुन्हेगारीला आळा बसलेला नाही. एकंदरीत गंभीर गुन्ह्यांचा ट्रेंड पाहता ही ‘गँगवार’च्या दिशेने वाटचाल दिसते.

ahmednagar crime murder
Pune crime news : बारामतीत पोलीस व सराफा विरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल...

खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, हाणामारी यासारखे गुन्हे शहर आणि जिल्ह्यात सर्रासपणे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी केडगाव येथे एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शेवगाव येथे दरोडा टाकून दोघांना जीवे मारण्यात आले. नगर शहरातील ओंकार भागानगरे या तरूणावर तलवारीने वार करून त्याचा खून करण्यात आला.

खूनाचे सत्र थांबण्यास तयार नाही. शहर आणि जिल्‍ह्यात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. ब्लॅकमेल, अपहरण, जागा बळकावण्याचे काम या टोळ्यांडून सुरू आहे. त्यात गुटखा, सुगंधी तंबाखू, मटका हे अवैध धंदे चालविण्याचे काम सराईत गुन्हेगार करत आहेत. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केला आहे.

सराईत टोळ्या

  • (२०२० पर्यंत) - २२

  • (२०२१ पर्यंत) - १८

  • (२०२२ पर्यंत) - २१

  • (जून २०२३ पर्यंत) - ०३

  • ५४२ गुन्हेगारांचे हिस्ट्र शीट

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांनी गेल्या तीन वर्षात सराईत गुन्हेगारांचे हिस्ट्री शीट तयार केले. त्यात गुन्हेगारांच्या तब्बल ४२ टोळ्या व ५४२ सराईत गुन्हेगार वारंवार गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत दीड हजाराहून अधिक फरार आरोपी पकडले आहेत, तरी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला अद्याप आळा बसलेला नाही.

‘टू प्लस’ नावालाच

दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या पाच हजार ४०४ गुन्हेगारांची यादी पोलिस प्रशासनाने तयार केली आहे. या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच असला तरी ओंकार भागानगरे खून प्रकरणासारखे प्रकार घडतच आहेत. ओंकारचे मारेकरी गणेश हुच्चे याच्यावर १५ तर नंदू बोराटे याच्यावर १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापुर्वीच दाखल आहेत. त्यावरून पोलिसांची ही ‘टू प्लस’ मोहीम देखील कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहर आणि जिल्ह्यात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. शेवगाव येथील दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देखील अटक केलेला आहे. सराईत गुन्हेगारांवर वॉच आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत.

- दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

ahmednagar crime murder
Pune Crime : विवाहितेवर पतीसह मित्रांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार

जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नगरची अवस्था सध्या बिहार आणि उत्तर प्रदेश सारखी झालेली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी त्यांचे हितसंबंध जोपासण्याच मश्गुल आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळत आहे. नगरकरांचा अजून किती अंत पाहणार आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला तत्काळ आळा घाला.

- ॲड. श्याम असावा, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com