Crime
Crimesakal

Trade Mark Scam : ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मेडिक्लोर-एम चे मालक बेनकर यांची ५० लाखांची फसवणूक

श्रीरामपूर : मेडिक्लोर-एम या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळते-जुळते मेडिक्युअर प्रॉडक्ट तयार करून ते मेडिक्लोर-एम आहे, असे भासवून, मालाची विक्री करून ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन केले. तसेच सुमारे ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी तीन कंपनीच्या मालकांविरुद्ध डेक्कन (पुणे) येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक गोपाळराव मुंडले (रा. प्लॉट नं. ३५ साईलीला अपार्टमेंट वनविहार कॉलनी, नाशिक), लक्ष्मी गणपत पवार (रा. आसावरी कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी, पुणे), सागर छगनराव थेटे (रा. ठक्कर रिट्रीट, जुना गंगापूर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजेंद्र बेनकर (रा.यशवंत ३८/१० प्रभात रोड, एरंडवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, ते स्वत:चा घरगुती आणि वैद्यकीय उत्पादने बनविणे व विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी व्ही. दुर्गा केमिकल उद्योग (१३ बी साईनाथ इस्टेट, गट नं. १८/०२, जौल्के शिवार, मुंबई-आग्रा रोड, ता. दिंडोरी, जि. नाशिक), जी.के.एस. व्हेंचर्स (इ ४/६ जुनी एमआयडीसी, सातारा), मंगल इंडस्ट्रीज (एच-४, ठक्कर रिट्रीट गंगापूर रोड) यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज केला होता. बेनकर यांनी रत्नप्रभा मेडीकल या नावाची एजन्सी सन १९९५ पासून चालू केली आहे.

त्यामध्ये औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी साबण, परफ्युमरी, अत्यावश्यक तेल, सौदर्य प्रसाधने, हेअर लोशन, जंतुनाशके, दंतवैद्यक आणि वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त उत्पादने, रसायनांची निर्मिती व विक्री महाराष्ट्रभर करतात. सदरचे उत्पादन मेडिक्लोर-एम या नावाने त्याची जाहिरात व विक्री करतात. या नावाचे आणि त्यांच्या विविध प्रकारांचे ट्रेडमार्क त्यांच्या मालकीचे आहेत. जून २०१९ मध्ये ते त्यांच्या पुणे येथील कार्यालयात असताना एका ग्राहकाने फोन करून कळविले की, वरील कंपन्यांमार्फत माझ्या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळतेजुळते मेडिक्युअर प्रॉडक्ट तयार करून ते मेडिक्लोर-एम आहे असे भासवून त्यांच्या मालाची विक्री करतात. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com