महसूल मंत्र्यांच्या कन्येने काढली पडळकरांची पात्रता

शरयू देशमुख
शरयू देशमुखSYSTEM

संगमनेर ः राज्याच्या सत्ताकेंद्रात महसूलमंत्रिपदासारखे महत्त्वाचे पद जबाबदारीने सांभाळणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली. थोरात यांनी उत्तर देण्यापेक्षा त्यांची कन्या शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. थोरात हे संयमी नेते समजले जातात. ते कधीही कोणावरही तोंड टाकून बोलत नाहीत.

पडळकर यांना किती गांभीर्याने घ्यायचे, प्रत्येकाने ठरवावे. फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही देशमुख यांनी टीका केली.

शरयू देशमुख
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. माझ्या हाती सत्ता दिल्यास ओबीसींना चार महिन्यांत पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

या विधानाचा समाचार घेताना महसूलमंत्री थोरात यांनी, ‘फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठीही त्यांनी यापूर्वी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती,’ असे म्हणत टोमणा मारला होता. या वक्तव्यामुळे आमदार पडळकरांनी थोरातांना लक्ष्य करीत, ‘महसूलमंत्रिपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षे अगोदर झाले आहे, याचेही भान त्यांना राहिले नाही,’ अशी टीका ट्वीटरवर केली होती.

ट्विटद्वारे दिले प्रत्युत्तर

आपल्या संयमी पित्यावर झालेल्या या टीकेला थोरातांच्या कन्या शरयू देशमुख खवळून उठल्या आहेत. त्यांनीही पडळकर यांना ट्वीटरद्वारे उत्तर दिले आहे. त्या लिहितात, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्काराची ओळख होते. असो. ज्याचे- त्याचे संस्कार,’ असा कडवट टोला लगावताना पडळकरांना भाषा आणि संस्काराची आठवण करून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com