esakal | जोरदार पावसामुळे तूर पाण्याखाली; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Crop damage due to heavy rains in Mahijalgaon in Karjat taluka

सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून नियमितपणे दररोज हजेरी लावीत आहे.या संततधार पावसामुळे हलक्या सह मध्यम जमिनीवर पाणी साचू लागल्याने तूर,कपाशी सह इतर पिके धोक्यात आली आहेत.

जोरदार पावसामुळे तूर पाण्याखाली; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून नियमितपणे दररोज हजेरी लावीत आहे.या संततधार पावसामुळे हलक्या सह मध्यम जमिनीवर पाणी साचू लागल्याने तूर,कपाशी सह इतर पिके धोक्यात आली आहेत.काही ठिकाणी पिकांना कोंब आले असून काही ठिकाणी पाने पिवळी पडू लागली आहेत.मात्र या मुळे शेतकरी वर्गात मोठी भिती निर्माण झाली आहे.

सध्या तालुक्यातील काही गावाचा अपवाद सोडल्यास दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी आशा तीन टप्प्यात जोरदार पाऊस पडत आहे.तालुक्यात सुरुवातीला पाऊस पडत नसून परतीचा पाऊस चांगला होतो असे मागील आकडेवारी सांगते.मात्र या वर्षी सुरुवातीला च पाऊस चांगला पडला असून सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाने मागील दहा वर्षाच्या विक्रम मोडीत काढले आहेत.अनेक गावात ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन होत नसून पिकाच्या वाढीला सूर्यप्रकाश आवश्यक असल्याने काही ठिकाणी वाढ खुंटल्याचे चित्र दिसत आहे. 

यंदा पाऊस चांगला असल्याने पिके जोमात आहेत परंतु जोरदार पावसाने तुरीच्या पिका बरोबर कांदा आणि कपाशी या पिकांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाईल या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले झाले आहेत. या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

माहिजळगाव आणि परिसरात मध्ये संततधार पावसाने शेतात पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे तुरीसह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई द्यावी.
- भैरवनाथ शेटे, सरपंच, जळगाव चौफुला, ता. कर्जत 

संपादन : अशोक मुरुमकर