esakal | मुसळधार पावसामुळे पारनेर तालुक्यात पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

parner

पारनेर येथून विसापूर तलावात जाऊन मिळणा-या हंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला. यंदा भरपूर पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्याला भासणार नाही, अशी चिन्ह आहेत. मात्र शेती पिकांचे व तालुक्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे पारनेर तालुक्यात पिकांचे नुकसान

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. तर कांदे, बाजरी, टॉमॅटो तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अति पाऊसामुळे अनेक गावचे रस्ते खूपच खराब झाले आहेत. तर काही गावांचे खडीचे कच्चे रस्ते तर वाहूनच गेले आहेत.

गेली अनेक वर्षात प्रथमच तालुक्यात वारेमाप व मुसळधार पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्वच गावांना पाऊस चांगला झाल्याने नदी, नाले, तालव व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. पारनेर येथून विसापूर तलावात जाऊन मिळणा-या हंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला. यंदा भरपूर पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्याला भासणार नाही, अशी चिन्ह आहेत. मात्र शेती पिकांचे व तालुक्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके तसेच भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात पारनेरसह ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, वाडेगव्हाण तसेच कान्हूपठार या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर परिसरात टॉमॅटो, कान्हूर पठार परिसरात कांदा व वाटाणा, सुपे परिसरात कांद्यासह फुलशेती व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

भाजीपाला, कांदा, कोथिंबीर, फुलशेती तसेच टॉमॅटो या पिकांसह फळबागांवरही रोग पडल्याने पिके पिवळी पडली आहेत. अनेक ठिकाणी नुकतेच लावलेले कांदे उपटूनवर आले आहेत. फुलशेती फुलली मात्र पाऊसामुळे फुले तोडता येत नाहीत. त्यातच पितृपंधरवाडा संपला व आता अधिक मास त्यामुळे फुलांना मागणी नाही व आलेली फुले पाऊसामुळे तोडता येत नाहीत. परिणामी फुले सुद्धा शेतातच खराब होत आहेत. एकंदर सर्वच पिकांचे नुकसान झाले असून शेतक-यांच्या हातात आलेली पिके डोळ्या देखत शेतातच खराब होताना दिसत आहेत.

या अगोदर राज्यात लॉकडाऊन झाल्याने अनेक शेतक-यांना भाजीपाला पिकवूनसुद्धा बाजारात विक्रीसाठी पाठवता आला नाही. तो शेतातच खराब झाला, नंतर पाऊसामुळे ऊडीद, मूग बाजरी ही पिके वाया गेली. अता अती पाऊसाने पिकांचे नुकसान होत आहे.
तालुक्यातील अनेक गावांचे रस्ते पाऊसामुळे खराब झाले आहेत. छोट्या गावांना जोडणारे खडीचे व कच्चे रस्ते तर वाहूनच गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचे दळवळण अवघड  झाले आहे.

विरोली ते हत्तलखिंडी या दोन गावांना जोडणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता तर पुर्ण उखडून गेला आहे. या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. हा रस्ता आहे की ओढा हेच समजत नाही. या रसत्याची तातडीने दुरूस्ती करावी, असी मागणी सरपंच प्रभाती मोरे व उपसरपंच राजश्री बुचडे यांनी केली आहे.
 
शेतकरी संघटनेचे अनिल देठे म्हणाले, तालुक्यातील शेतक-यांना शंभर टक्के पिक विमा मिळावा. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. तसेच तालुक्यातील खाराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची तातडीने व्यवस्था करावी. 

संपादन : सुस्मिता वडतिले

loading image
go to top