म्हणे बांधावर खत देणार... येथे रांगेत उभा राहूनही मिळेना; शेतकऱ्यांमध्ये संताप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत देणार होते, परंतु तसे झाले नाही आणि आता अकोल्यात युरियाच्या एका गोणीसाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी खतासाठी प्रचंड गर्दी केली. शेतकरी आधार कार्ड घेऊन कृषी सेवा केंद्रच्या पुढे गर्दी करून पहाटपासून उभे राहत आहेत. राजूरलाही शेतकरी खतासाठी गर्दी करत आहेत.

अकोले (अहमदनगर) : सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत देणार होते, परंतु तसे झाले नाही आणि आता अकोल्यात युरियाच्या एका गोणीसाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी खतासाठी प्रचंड गर्दी केली. शेतकरी आधार कार्ड घेऊन कृषी सेवा केंद्रच्या पुढे गर्दी करून पहाटपासून उभे राहत आहेत. राजूरलाही शेतकरी खतासाठी गर्दी करत आहेत.

अकोले शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे येथे सात दिवसासाठी लोकडाऊन आहे. कृषी सेवा केंद्रांना परवानगी असली तरी सोशल डिस्टन्सींग पळणे गरजेचे आहे. ही जबाबदारी कृषी सेवा केंद्राची आहे. शहरातील अभिषेक कृषीसेवा केंद्रात 250 युरियाच्या गोण्या आल्या आहेत. परंतु या केंद्राने फक्त 80 गोण्याची टोकन दिल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत स्वतः 80 टोकन वाटले. परंतु टोकन न मिळालेल्या शेकऱ्यांना मात्र प्रचंड गोंधळ सुरू केला. अखेर अकोले तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी प्रत्येक्ष शेतकऱ्यांनची भेट घेऊ त्यांचे समाधान केले. शिल्लक असेल ते खत घेऊन बाकीच्या शेतकऱ्यांना खत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचे समाधान झाले. सध्या बाजरीचे शेतात उभी आहे. पाऊस झाला आहे वेळेत खते न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

राजूर येथेही फक्त 445 गोण्या खत उपलब्ध असल्याने त्यापैकी 60 गोण्या माउली कृषी केंद्र आंभोळ याना तर 385 गोण्या प्रत्येक शेतकरी अशा 385 शेतकऱ्यांना देण्यात आल्या. उर्वरित 200 शेतकऱ्यांना खताविनाच पारत जावे लागले. याबाबत तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी तालुक्यात सात केंद्रात युरिया सप्लाय कमी आल्यामुळे अडचण होती. मात्र आज पूर्ववत युरिया मिळणार असल्याचे सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd of farmers in front of Krishi Seva Kendra in Akole taluka to buy fertilizer