esakal | अतिपावसामुळे उसाचे पिक जनीमदोस्त; कपाशी, तूरीचेही नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to crops in Pathardi taluka due to rains

अतिपावसामुळे उस, कपाशी, तुर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नद्यांना पुर येऊन जमीन व वाहुन जाण्याचे प्रकारही घडले आहेत. कोरडगाव व टाकळीमानुर मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने या भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.

अतिपावसामुळे उसाचे पिक जनीमदोस्त; कपाशी, तूरीचेही नुकसान

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यात अतिपावसामुळे उस, कपाशी, तुर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नद्यांना पुर येऊन जमीन व वाहुन जाण्याचे प्रकारही घडले आहेत. कोरडगाव व टाकळीमानुर मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने या भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. महसुल व कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळणार आहे. 

शेतक-याला आता सरकारी मदतीची व आधाराची गरज आहे. यावर्षी तालुक्यात साडे तिन महीन्यापासुन पाऊस चांगला झाला आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या अति पावसामुळे उसाची पिके जमीनीवर लोळतच आहेत. कपाशी व तुरीच्या मुळ्या सडल्याने पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे. शेकडो एकरावरील उस व कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

एकाच दिवसात तालुक्यात कोरडगाव-65 मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-526 मि.मी.), टाकळीमानुर-60 मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-1004 मि.मी.), मिरी- 33 मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-537 मि.मी.), करंजी- 17 मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-593 मि.मी.), माणिकदौंडी-20 मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-559 मि.मी.), पाथर्डी- 31मि.मी.(एकुण पडलेला पाऊस-860 मि.मी.) पाऊस पडला आहे.आतापर्यंत तालुक्यात यावर्षी 4079 मि.मी. पाऊस पडला आहे.

गेल्या बारा ते पंधरा वर्षात एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. आता काही भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. रात्रभर पडलेल्या पावासामुळे पिकामधे गुडघाभर पाणी साचलेले होते. नद्या व नाल्यामधुन पाणी वाहत होते. उसाचे व कपाशीचे पिक वाया जाण्याची शक्यता आहे. मोहोजदेवढे, येळी, टाकळीमानुर, भालगाव, खरवंडी, मिडसांगवी, कोरडगाव, पागोरीपिपंळगाव, सुसरे, खेर्डे, माळेगाव, निपाणीजळगाव, अकोला, फुंदेटाकळी, शेकटे या भागात पिकांचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले आहे.

येळीचे सरपंच संजय बडे म्हणाले, कोणतीही गोष्ट अति झाली की तिथे माती होतेच. आज शेतक-यांच्या पिकांची माती झाली आहे. पाऊस पडला मात्र उसाची पिके जमीनीवर झोपली आहेत. त्याला उंदरे लागुन त्यांचे पन्नास टक्कयापेक्षा जास्त नुकसान होत आहे. कपाशी व तुरीची मुळे कुजली आहे. दोड्या काळ्या पजुन गळु लागल्या आहेत.नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी.

तहसीलसार नामदेव पाटील म्हणाले, पावसामुळे काही भागात काही क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसुल विभागाचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. आहे ती वस्तुस्थीतीचा अहवाल वरीष्ठ अधिका-यांना दिला जाईल. चांगला पाऊस झाल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र आता रब्बी हंगामाची पिके तरी चांगली येतील. 

संपादन : अशोक मुरुमकर