esakal | पडत्या पावसात कांद्याच्या वखारीवर वीज पडली अन्‌ क्षणात शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to farmers due to lightning strike at Kauthe in Shrigonda taluka

कौठे येथील शेतकरी चंद्रकांत अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मोठ्या कष्टातून पिकलेल्या कांद्याला अजून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती.

पडत्या पावसात कांद्याच्या वखारीवर वीज पडली अन्‌ क्षणात शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील कौठे येथील शेतकरी चंद्रकांत अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मोठ्या कष्टातून पिकलेल्या कांद्याला अजून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र या  वखारीवर शनिवारी रात्री वीज पडून कांद्याचे मोठे नुकसान झाले. वीज पडल्याने कांद्याची निम्मी वखार जळाली तर राहिलेली वखार पावसाच्या पाण्यात खराब झाली.

सध्या कांद्याला चांगला बाजार असल्याने शेतकरी खुश आहे. मात्र अजून बाजार वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने वाखारीत साठवलेला कांदा काही दिवस ठेवून नंतर पैसे करून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

कौठे येथील शेतकरी सूर्यवंशी यांनी सुमारे ५०० गोणी कांदा असाच वखारीत साठवून ठेवला होता.  शनिवारी रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसात सूर्यवंशी यांच्यावर वखारीवर वीज पडली. त्यामुळे कांद्याच्या वखारीवरील प्लास्टिक कागद व त्याखालील निम्मा कांदा विजेच्या आगीत सापडला.

शिवाय रात्रभर पाऊस सुरु असल्याने राहिलेला कांदा पाण्याने खराब झाला. त्यामुळे सूर्यवंशी यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाचे निसर्गानेच नुकसान केले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी भावना कौठे येथील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top