esakal | तणनाशक फवारणीमुळे आरोग्यवर्धक गावरान भाज्या होतायत दुर्मिळ
sakal

बोलून बातमी शोधा

Ran Bhajya

तणनाशक फवारणीमुळे आरोग्यवर्धक गावरान भाज्या होतायत दुर्मिळ

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि. नगर) : शेतकरी पिकांमध्ये सर्रास तणनाशकांची फवारणी करत आहेत. त्यामुळे शेतातील गावरान भाज्या लुप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या आरोग्यवर्धक भाज्या गायब झाल्याने त्यातून शरीरिरास मिळणारे विविध घटक मिळत नसल्याने रोगप्रतिकारक शक्तीही (Immunity) कमी होत आहे. (Damage-natural-vegetables-due-to-fertilizer-spraying-ahmednagar-agriculture-news)

तणनाशक उठलेचत रानभाज्यांच्या मूळावर

मृग नक्षत्राचा पाऊस पडला की शेतकरी खरिपाच्या पेरणी कामाला लागतो. खरिपाच्या पिकासोबत अनेक पालेभाज्या व तण शेतात मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. यामध्ये राजगिरा, आळू, तांदूळका, अंबाडी, खापरकुट्टी, कपाळपुडी, कवठ, उंबर, कुडूंची अशा जवळपास वीस ते पंचवीस प्रकारच्या भाज्या शेतात उगवतात.


या भाज्यांची चव जिभेवर रेंगाळणार असते. त्याद्वारे शरीरिला विविध घटकही मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षक्तीही चांगली वाढते. या वनस्पती जनावरांच्या रोगांचा नायनाट करण्याचे कामही करतात. जवळपास चौदा ते पंधरा प्रकारच्या भाज्या मधुमेह, पोटदुखी, खोकला, ताप आदी आजारांवर औषधी म्हणून वापरल्या जातात. काही भाज्या गर्भवती महिला व बालकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. पूर्वी सेंद्रिय शेती हा शेतीचा मुख्य भाग होता. त्यामुळे मानवाची आर्युमर्यादा ही चांगली होती. आता मात्र संकरित शेती व जास्त उत्पादनाच्या मानसिकतेतून शेतात सर्रास तणनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाज्याही तणांसह जळून जात आहेत. तणनाशक या रानभाज्यांच्या मूळावर उठल्याचेच चित्र आहे.

हेही वाचा: ६४ वर्षांची परंपरा मोडीत; येवल्यात शेतकरीहिताचा ऐतिहासिक निर्णय

''रानभाज्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. तसेच दूध, तूप, लोणी याचा वापर दररोजच्या आहारात केल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सध्या शेती करण्याची पद्धती बदलल्यामुळे व शेतात मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी पेरणी सोबतच तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे या भाज्या लुप्त होत आहेत.'' - संपत उगले, प्रगतिशिल शेतकरी, राळेगणसिद्धी

(Damage-natural-vegetables-due-to-fertilizer-spraying-ahmednagar-agriculture-news)

हेही वाचा: विद्यार्थ्यांनो, ऐका हो ऐका... परीक्षा शुल्क ७५ टक्के माफ!

loading image