अतिवृष्टीने अकोल्यात भातशेतीचा झाला भात

शांताराम काळे
Sunday, 4 October 2020

तालुक्‍यातील पांजरे, उडदवणे, साम्रद या भागातील पन्नासपेक्षा अधीक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अकोले : तालुक्‍यातील विविध भागात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. विशेषत: भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील आदिवासी भागात सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला. त्यामुळे आदिवासी भागातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

तालुक्‍यातील पांजरे, उडदवणे, साम्रद या भागातील पन्नासपेक्षा अधीक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारी अचानक पाऊस सुरू झाला. हा पाऊस इतका जोरदार होता की, कमरापर्यंत उभे राहिलेले भात पिके अक्षरश: झोपली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या हाताला भात पिक मिळणार नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

याबाबत शेतकरी बुवाजी गांगड यांनी सांगितले की, आधीच कोरोणा, त्यात हे अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. खावटी योजना सरकारने केवळ घोषणा करून टाकली, मात्र आजपर्यंत खावटीचे धान्य आले ना, बॅंकेत पैसे जमा झाले. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी बेरोजगारी, अस्मानी संकट, आल्याने प्रचंड अडचणीत सापडला आहे.

कृषी, महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. भातपीकावर करपा, तांबेरा रोग पडल्याने तेही काही ठिकाणी खराब झाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परंतु, यंदा मोठे पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to paddy fields in Akola due to heavy rains