नगरच्या माध्यमिक अन्‌ वेतन पथक कार्यालयात नांदतो अंधार

दौलत झावरे
Saturday, 17 October 2020

जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये माध्यमिक व वेतन पथक कार्यालय आहेत.

नगर : जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये माध्यमिक व वेतन पथक कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये भारनियम झाल्यानंतर कायमच अंधार असतो. 

सध्या वेतन पथक कार्यालयात अंशकालीन निवृत्ती वेतनाचे काम सुरु असून जिल्ह्यातील शाळांमधून शिक्षकत्तेर कर्मचारी प्रस्ताव घेऊन येत आहे. मात्र दोन दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरु असून वेतन पथक कार्यालयाबरोबरच माध्यमिक कार्यालयातही अंधार राहत आहे. 

सध्या अंथकालनी निवृत्ती वेतनाचे कामे सुरु असल्याने व ती वेगाने करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरु आहे. परंतु, विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर वेतन पथक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोबाईच्या उजेडाचा सहारा घेऊन कामकाज करावे लागत आहे. ही गेल्या अनेक दिवसांची समस्या असूनही त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वेतनपथक कार्यालयाप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागाचीही अवस्थ आहे. विशेष म्हणजे वेतन पथक कार्यालयातील इर्व्हटर नादुरुस्त झाल्याने कायमच अंधार राहत आहे.

वेतन पथक कार्यालयातील इव्हर्टर नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा खंडीत राहत आहे. इव्हर्टरची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. 
- स्वाती हवेले, अधीक्षक, वेतन पथक कार्यालय, अहमदनगर 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darkness in the office of Nagar Zilla Parishad