
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास संपलेल्या चोवीस तासांत दीडशे मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे दारणा व गंगापूर ही धरणे ओव्हर फ्लो झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा तीस टक्क्यांवर आणि मुळा धरणातील पाणीसाठा छत्तीस टक्क्यांवर गेला. गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. यंदा धरणे भरल्याची गूडन्यूज येत्या पंधरा आॅगस्टपूर्वीच मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ऊस शेतीच्या क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने कमालीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या या जोरदार सलामीने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला फिलगुडचा संदेश दिला.