सोनईत गौरी गडाखांच्या नावाने अद्ययावत वाचनालय उभारणार

विनायक दरंदले
Monday, 16 November 2020

पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर तिच्या आठवणीचा दिवा सतत तेवत राहण्यासाठी सोनईत तिच्या नावाने पुढील वर्षाच्या पाडव्याला अद्ययावत मोफत वाचनालय सुरु करण्यात येणार आहे.

सोनई (अहमदनगर) : पत्नी गौरी गडाख यांच्या निधनानंतर तिच्या आठवणीचा दिवा सतत तेवत राहण्यासाठी सोनईत तिच्या नावाने पुढील वर्षाच्या पाडव्याला अद्ययावत मोफत वाचनालय सुरु करण्यात येणार आहे.असा संकल्प यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी व्यक्त केला आहे.

सोनईत आज गौरी गडाख यांचा दशक्रियाविधी झाला.महंत उध्दव मंडलिक महाराज,ओमशांती परीवाराच्या उषादिदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,उद्योजक विजय गडाखसह परीवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.दशक्रियानिमित्त सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख यांनी सदगुरु नारायणगिरी प्रबोधन प्रतिष्ठाणच्या वारकरी शिक्षणासाठी एक्कावन्न हजाराची देणगी दिली.
आपली भावना व्यक्त करताना प्रशांत पाटील गडाख म्हणाले,"झालेले दुःखं खुप मोठे असले तरी सामाजिक बांधिलकीची नवनिर्मिती आत्मिक समाधान देते अशी शिकवण जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिल्याने अद्ययावत वाचनालयाचा संकल्प केला आहे.

"येथे साहित्यीक ग्रंथाबरोबरच,अध्यात्मिक व गरजूंना आवश्यक शालेय पुस्तके असणार आहे.असे त्यांनी सांगितले.नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी गौरी यांच्या अस्थी कौतुकी सुशोभीकरणातील झाडांना टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An up to date library named after Gauri Gadakh will be set up in Sonai