esakal | संगमनेरात सोमवारी रंगणार फेसबुकवर पहाट गाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Dawn songs will be sung on Facebook at Sangamnera on Monday

दरवर्षी विविध अभिनव संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. यावर्षी कोरोनामुळे ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले,.

संगमनेरात सोमवारी रंगणार फेसबुकवर पहाट गाणी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख सांगणाऱ्या महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेला दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सोमवार ( ता. 16 ) रोजी सकाळी सहा वाजता फेसबुकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे.

संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वरसंगम संगीत प्रसारक संस्थेच्यावतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा संगमनेरकर रसिकांनी आपापल्या घरूनच आनंद घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संयोजक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. 

दरवर्षी विविध अभिनव संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. यावर्षी कोरोनामुळे ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी त्यांनी गायलेली निवडक गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

डॉ. संतोष खेडलेकर यांची संकल्पना व निवेदन असलेल्या या कार्यक्रमात विकास भालेराव, सोपान भालके, गणेश धर्माधिकारी व अनुजा सराफ हे कलाकार गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजक सत्यजित सराफ यांच्यासोबत राजकुमार सस्कर, अजित गुंदेचा, श्रीकांत गडकरी व शिवकुमार सस्कर आदी संगीतसाथ करणार आहेत.

संगमनेरकर रसिकांनी ऑनलाईन पद्धतीने फेसबुकवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा आस्वाद घरूनच घ्यावा असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, कार्यक्रमाच्या निमंत्रक कांचन थोरात, शरयू थोरात, धनश्री सोमाणी यांच्यासह संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, डॉ. अरविंद रसाळ, अशोकराव सराफ, देविदास गोरे व अभिजित खेडलेकर यांनी केले आहे.