
अहिल्यानगर : भरदिवसा बंद फ्लॅटचा कडी कोयंडा व कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक करून सोन्या- चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना सारसनगर येथील त्रिमूर्ती चौकाजवळील, उषा प्राईड अपार्टमेंट येथे सोमवारी (ता. २३) घडली. याबाबत स्नेहल संतोष कुलकर्णी यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.