Death Threat to Witness in Yeli Murder Case : रात्री एक वाजता सारिका हंगे यांच्या राहत्या घरासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केली. “तू जर तक्रार मागे घेतली नाहीस, तर तुझ्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करू, तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली.
Yeli Murder: Four Accused of Threatening Key WitnessSakal
पाथर्डी : तालुक्यातील येळी येथील एका खून प्रकरणातील आरोपींनी खटल्यातील साक्षीदारावर दबाव आणत शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.