
मृत ओमकारची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी आज मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अहमदनगर
नगर तालुका ः वाळकी येथे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओमकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) असे त्याचे नाव आहे.
वाळकी येथे 15 दिवसांपूर्वी जून्या वादातून ओमकार भालसिंग यास विश्वजित रमेश कासार याच्यासह सहा ते सात जणांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने, ओमकार याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता खुनाचे कलम वाढविले आहे. घटना घडल्यापासून आरोपी पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत मृत ओमकारची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी आज मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.