कर्जामुळे सौंदाळ्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

सौंदाळे येथील संतोष शिवाजी आरगडे या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून, विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
Debt ridden farmer commits suicide Soundale Ahmednagar
Debt ridden farmer commits suicide Soundale Ahmednagarsakal

नेवासे : तालुक्यातील सौंदाळे येथील संतोष शिवाजी आरगडे (वय ४५) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून, विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.आरगडे यांना शेतीउत्पन्नात होत असलेला सततचा तोटा, सहकारी सोसायटी, पतसंस्थेच्या कर्जाचा वाढता बोजा, यातून आलेल्या नैराश्यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी शेवगाव येथे विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यांच्यावर शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com