खासदार विखेंच्या नव्हे तर आमदार लंके यांच्या बैठकीनंतरच पिंपळगांजोगाचे आवर्तन

The decision to release the water at night was sealed by video conference on Friday at Parner.jpg
The decision to release the water at night was sealed by video conference on Friday at Parner.jpg

पारनेर (अहमदनगर) : पिंपळगांवजोगा धरणाच्या अवर्तनासंदर्भात खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार निलेश लंके,  यांच्यात अलिकडेच कलगीतुरा रंगलेला होता. दरम्यान शुक्रवारी (ता. 9 ) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत खासदार सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके, जुन्नरचे आमदार अतुल बेनके  तसेच पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूस्कर यांच्यासह इतर अधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी पिंपळगाव जोगाचे एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्स होऊन रात्री पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आवर्तन आमदार लंके यांच्या पुढाकारामुळेच सुटले असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर डॉ. विखे यांच्याही कार्यालयाने तसे कळविले आहे. त्यामुळे आवर्तनाचे श्रेय नेमके कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आवर्तनाचे श्रेय कोणालाही जावो पारनेरच्या शेतक-यांना पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील पिंपळगाव जोगा आवर्तनाच्या लाभ क्षेत्रातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावऱण निर्माण झाले तयार आहे.

मागील आवर्तन सुटले, त्यावेळी  तालुक्यातील गावांपर्यंत ते पोहचलेच नाही. अवर्तनाच्या भरवशावर असलेली पिके व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. अवर्तन संपले तरी पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतक-यामध्ये असंतोषाचे वातावरण होते. आमदार लंके यांनी यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. पाटबंधारेचे अधिकारी तसेच मंत्री पाटील यांनी या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेऊन पारनेरसाठी विशेष आवर्तन सोडण्याचे मान्य केले होते. दरम्यान अळकुटी येथे डॉ. विखे यांनीही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अवर्तन सोडण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर लंके यांनी डॉ.विखे यांनी पारनेरच्या पाणी प्रश्‍नात लुडबूड करू नये आम्ही आमचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सक्षम आहोत, असा  इशारा दिला होता. त्यावर विखे यांनीही हिंमत असेल तर पुणे जिल्हयातील नेत्यांशी संघर्ष करा असे प्रत्युत्तर दिले होते. 

पिंपळगाव जोगाचे टेल टू हेड असे 22 दिवसांचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे. पहिले नऊ दिवस पारनेर तालुक्यासाठी पुर्ण दाबाने पाणी देण्याचे  ठरविण्यात आले आहे. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येणार आहे.

आवर्तनाच्या प्रतीक्षेत डोळे पाणावले या अशयाचे वृत्त सकाळने दोन दिवसांपुर्वीच छापले होते. त्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आल्याने शेतक-यांकडून 'सकाळ' ला ही धन्यवाद देण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com