बाजार समितीतील शेतमालाची आवक घटली

Decreased inflow of goods in the market committee
Decreased inflow of goods in the market committee
Updated on

नगर : कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. शेतमालाला उठाव नसल्याने व खरेदीसाठी परराज्यांतून व्यापारी येत नसल्याने बाजार समितीतील कांद्यासह इतर शेतमालाची आवक घटली आहे. शिवाय भावात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

लॉकडाउनमुळे सर्वच ठप्प झाले. शेती व्यवसाय सुरू असला, तरी शेतमालाला मागणी नाही. परिणामी भाव कोसळले आहेत. त्यामुळे सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक घटली आहे. रोज प्रत्येक बाजार समितीत 25 ते 60 हजार क्विंटल शेतमालाची आवक होत असते. आता फक्त एक हजार ते दोन हजार क्विंटल आवक होत आहे. पूर्ण जिल्ह्यात 10 ते 12 हजार क्विंटल शेतमाल येत आहे.

आवक कमी असली, तरी त्यालाही मागणी कमीच आहे. त्याचा परिणाम भावावर झाला आहे. शेतमाल विक्रीला आणण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 
मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यात एक लाख 40 हजार 178 हेक्‍टरवर कांदालागवड झाली. त्यातील बराचसा कांदा काढून झाला आहे. अवकाळी पावसाने काही ठिकाणी कांद्याचे मोठे नुकसान केले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून व्यापारी येत नसल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत. हॉटेल, उपाहारगृहे बंद असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाट्याला मागणी नाही. 

परराज्यातून कांद्याला थोडीफार मागणी असली, तरी तिकडे कांदा पाठविणे जिकिरीचे झाले आहे. कांदा वाहतुकीसाठी वाहनांच्या भाड्यात दुपटीने वाढ झाली आहे. 

लॉकडाउनमुळे हॉटेले बंद

कांद्यासह इतर शेतमालाला मागणी कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे हॉटेले बंद आहेत. त्यामुळे कांद्यासह इतर मालांचीही मागणी कमी झाली आहे. सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर शेतमालाला भाव मिळू शकतो. 
- अरुण तनपुरे, सभापती, बाजार समिती, राहुरी 

"नाफेड'मार्फत कांदा खरेदीची परवानगी

शासनाने "नाफेड'मार्फत बाजार समित्यांना कांदा खरेदीची परवानगी देणे गरजेचे आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होईल. 
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com