esakal | ...अन्यथा कोरोना बाधितांसह कामगार आयुक्त कार्यालयात 'सत्याग्रह'
sakal

बोलून बातमी शोधा

Dedication to the Assistant Commissioner of Labor Statement of various demands of the trade union

समर्पण मजदूर संघाच्या दिर्घकालीन प्रलंबित मागण्या आठवड्याच्या आत पूर्ण न केल्यास कोरोनाबाधित कामगारांसह सहायक कामगार आयुक्त कामगार विभाग कार्यालयात बेमुदत 'बैठा सत्याग्रह' करणार असल्याचा इशारा समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिह घुले यांनी सहायक कामगार आयुक्ताना निवेदनाद्‌वारे दिला आहे.

...अन्यथा कोरोना बाधितांसह कामगार आयुक्त कार्यालयात 'सत्याग्रह'

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : समर्पण मजदूर संघाच्या दिर्घकालीन प्रलंबित मागण्या आठवड्याच्या आत पूर्ण न केल्यास कोरोनाबाधित कामगारांसह सहायक कामगार आयुक्त कामगार विभाग कार्यालयात बेमुदत 'बैठा सत्याग्रह' करणार असल्याचा इशारा समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिह घुले यांनी सहायक कामगार आयुक्ताना निवेदनाद्‌वारे दिला आहे.

नोंदणी व नूतनीकरण प्रदीर्घ काळापासून बंद आहे ती सुरू करावी. बाद कामगारांचे नूतनीकरण त्वरित करून त्यांना योजना लागू कराव्यात. पाच हजार रुपये अर्थसहाय्य पात्र लाभार्थी यांना कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे तांत्रिक दृष्ट्या अपात्र केले होते त्याचा लाभ त्यांना त्वरित द्यावा. ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येतात त्या सोडवाव्यात. ज्यांचे ऑनलाईन नूतनीकरण होत नाही त्यांची ऑफलाईन व्यवस्था करावी.

सर्व योजनांची अंमलबजावणी करून लाभ वाटप कराव. मयत लाभ, प्रसूती लाभ, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण विद्यावेतन, लग्नासाठीचे अनुदान याचे त्वरित वितरण करावे. तसेच 0 वरील सर्व मागण्या या जुन्याच असून यावर वेळोवेळी चर्चा होऊन आश्वासने देण्यात आलेली आहेत. दरम्यान याबाबत सहायक कामगार आयुक्तांनी गांभीर्याने न घेतल्यास कोरोनाबाधित कामगारांनाबरोबर घेऊन आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू असा इशाराही निवेदनात डॉ. करणसिंह घुले यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर