esakal | माजी आमदार कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या मुर्शतपूरमधील सभागृहाचे लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

Dedication of Social Hall at Murshatpur

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रत्यत्नातून मंजुर झालेल्या देर्डे को-हाळे व मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण नुकतेच झाले. कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, माजी उपाध्यक्ष, संचालक अरूण येवले यांचे हस्ते हे लोकार्पण झाले.

माजी आमदार कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या मुर्शतपूरमधील सभागृहाचे लोकार्पण

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रत्यत्नातून मंजुर झालेल्या देर्डे को-हाळे व मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण नुकतेच झाले. कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, माजी उपाध्यक्ष, संचालक अरूण येवले यांचे हस्ते हे लोकार्पण झाले.

2018- 19 मधील ग्रामविकास 2515 या निधी अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारण्यात आले. देर्डे को- हाळे येथील 10 लाखाच्या पुर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी अरुण येवले म्हणाले, मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य दिलेल्या कोल्हे यांनी देर्डे को- हाळे गावासाठी भरीव निधी दिलेला आहे. 

स्मशानभूमी बैठक शेड पेव्हींग ब्लाॅक चार लाख, बसथांबा शेड सात लाख 65 हजार, हायमास्ट दोन लाख 60 हजार आदी कामे मार्गी लागले. मुर्शतपूर येथील 10 लाख खर्चाच्या पुर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचे हस्ते करण्यात आले.

दवंगे म्हणाले, मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य दिलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुर्षतपूर गावासाठीही भरीव निधी दिलेला आहे. त्यामुळे गावातील अनेक कामे मार्गी लागले आहेत. स्मशानभूमी शेड बांधकाम व पेव्हींग ब्लॉक 15 लाख, मुस्लीम कब्रस्थान पाच लाख, स्मशानभूमी बैठक शेड चार लाख, हायमास्ट एक लाख 20 हजार, सामाजिक सभागृह 25 लाख आणि बसथांबा शेड तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत धारणगाव- मुर्शतपूर- जेउरपाटोदा रस्ता आदी कामे करण्यात आली आहे. अशा प्रकारचे विविध कामांना निधी देउन गावच्या विकासात भरीव मदत केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image