तुकाराम मुंढे यांची शिर्डी येथे नियुक्ती करण्याची मागणी

गौरव साळुंके
Friday, 13 November 2020

श्रीक्षेत्र साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकार्यांनी केली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीक्षेत्र साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकार्यांनी केली आहे. या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना वरील मागणीचे निवेदन पाठविले आहेत.

श्री साईबाबांचे नाव देशासह जगभरात लौकिक असुन साईबाबांचा भक्त परिवार सर्वत्र आहे. नियमांवर बोट ठेवून नियमबाह्य कामावर अंकुश ठेवणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे मुंढे यांची शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यास देवस्थानचा आदर्श इतर देवस्थान घेतील. देवस्थानची खर्चाची होणारी उधळपत्ती थांबून विधायक कार्याला गती मिळेल.

इतर खर्चाला फाटा देऊन देवस्थानच्या तिजोरीत मोठी भर पडेल. समाजउपयोगी कार्य चांगल्या प्रमाणात देवस्थान करु शकेल. सध्या साई सुपर रुग्णालयामध्ये असणाऱ्या विविध समस्या, कर्मचारयांचे प्रश्न, देखरेख, मंदिर सुरक्षेसह साई भक्तांची सुरक्षा आणि त्यांना संरक्षण हे महत्त्वाचे असल्याने मुंडे यांची नियुक्ती झाल्यास संस्थांना चांगले दिवस येणार असल्याचे निवेदनात नमुद केल्याचे डुंगरवाल यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for appointment of Tukaram Mundhe at Shirdi