esakal | संगमनेरमधील धोकादायक इमारती पाडण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for demolition of dangerous buildings in Sangamner

भिवंडी येथे जुनी व धोकादायक इमारत कोसळून 30 नागरिकांना प्राणाला मुकावे लागले.

संगमनेरमधील धोकादायक इमारती पाडण्याची मागणी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : नुकतीच भिवंडी येथे जुनी व धोकादायक इमारत कोसळून 30 नागरिकांना प्राणाला मुकावे लागले. या पार्श्वभुमिवर संगमनेर शहरातील नगरपालिकेने धोकादायक घोषीत केलेल्या 27 इमारतींबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी भाजपाच्या वतीने माजी नगरसेवर शिरीष मुळे यांनी केली आहे.

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या संगमनेर शहरात नागरिकांच्या जीवीत व वित्तहानीला कारणीभूत ठरु शकतील आशा 27 इमारती जुन्या व मोडकळीला आल्याने धोकादायक असल्याचे नगरपालिकेने घोषीत केले आहे. त्यानुसार संबंधितांना या इमारती पाडून त्यांची विल्हेवाट लावण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र याबाबत काहीच हालचाल होताना दिसत नाही. या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमिवर अशा इमारतींमुळे तेथील रहिवाश्यांच्या जीविताची हानी होण्याची शक्यता आहे. यातील काही नागरिकांची इमारती पाडण्याची किंवा त्या जागी नवीन घर बांधण्याची आर्थिक ऐपत नसल्याने निवाऱ्यासाठी त्याच इमारतीत धोका पत्करुन राहात आहेत. अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाल्यास त्यांचे पुर्नवसन होवून त्यांची निवासाची सोय होणार आहे. 

यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेवून अशा इमारती पाडण्याची आवश्यकता असल्याने याबाबत नगराध्यक्ष दुर्गा तांबे व पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्यामुळे यांनी म्हटले आहे. याप्रश्नी चांगली कृती योजना बनवून त्यावर तातड़ीने कार्यवाही करण्याची मागणी भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. 

नियमाप्रमाणे धोकादायक बांधकाम पाडण्याची जबाबदारी वास्तूच्या मालकाची असते. त्यांना शक्य नसल्यास नगरपरिषद ते बांधकाम पाडून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करते. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ स्वतःची जागा असलेल्या कुटूंबांना मिळू शकतो. नगरपरिषदेकडे यासाठी सार्वजनिक मालकीची जागा नाही. सध्या या योजनेतून 279 घरांचे प्रस्ताव पाठवले आहेत.
- डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image