
शुभम गोरे
अहिल्यानगर : मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. पहिल्या गुरुवारपासून घरोघरी लक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांना सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे फुलांचे दर देखील काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे फूलविक्रेते व उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.