
नव्या कार्यकारिणीत भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर व भाजप नेते सचिन देसरडा यांच्यासह तब्बल अठराजणांची वर्णी लागली आहे.
नेवासे : भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी नुकतीच भाजप व भाजप प्रणित विविध आघाड्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यात नेवासे तालुक्याला झुकते माप देण्यात आले असले तरी ग्रामीण भागात गावोगावी भाजप वाढविणाऱ्या भाजपच्या निष्ठावान कार्येकर्त्यांना डावलण्यात आल्याने भाजपच्या जुन्यांत कमालीची नाराजीचा सूर आहे.
नव्या कार्यकारिणीत भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर व भाजप नेते सचिन देसरडा यांच्यासह तब्बल अठराजणांची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या उत्तर जिल्हा कार्यकारिणीत नेवासे तालुक्यातील पदाधिकारी व त्यांची पदे असे : सचिन देसरडा, (जिल्हा उपाध्यक्ष), नितीन दिनकर ( जिल्हा संघटन चिटणीस), दिलीप नगरे, अंकुश काळे ( जिल्हा सचिव), अॅड. पंढरीनाथ अंबाडे (कायदा सेल संयोजक), ज्ञानेश्वर बर्डे ( जिल्हा माजी सैनिक सेल संयोजक), ज्ञानेश्वर पेचे, दिनेश कुलकर्णी, दिलीप पवार, नामदेव खंडागळे, विश्वास काळे, आशा मुरकुटे, माजी नगराध्यक्षा संगीता बर्डे, चंपालाल बोरा, दत्तात्रय काळे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) तर विठ्ठल लंघे, बाळासाहेब मुरकुटे, उदयसिंह चंदेल (जिल्हा कार्यकारिणी कायम निमंत्रित सदस्य).
दरम्यान तालुक्यातील अनेक भाजपच्या महत्वाच्या सक्रिय ज्येष्ठ, तरुण निष्ठावान नेते, माजी पदाधिकारी, कार्येकर्त्यांना नव्या कार्येकारणीत डावलण्यात आल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप कार्येकारणीतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे आगामी काळात नेवासे भाजपमध्ये अंतर्गत कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या कार्येकारणीत यांना डावलले
जिल्हा कार्यकारणीत भाजप नेते व नियोजन मंडळाचे माजी सदस्य दिनकर गर्जे, ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे, युवा नेते अनिल ताके, ऍड. संजीव शिंदे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, पोपट जिरे, सुभाष पल्लोड, गिरीश जोशी, डॉ. रावसाहेब फुलारी या भाजप निष्ठावानांना डावलण्यात आल्याचा सूर सध्या नेवासे तालुक्यात ऐकायला मिळत आहे.
भाजपची ताकद वाढणार : नितीन दिनकर
"जिल्हा भाजप कार्येकारणीत तालुक्याला झुकते माप मिळाले असून आम्ही सर्वजण भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्येंत राबविण्याचा प्रयत्न करू. तालुक्यात नक्कीच पक्षाची ताकद वाढणार आहे असा विश्वास भाजपचे नेवासे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केला.
संपादन - अशोक निंबाळकर